गड्या आपला गाव बरा विरुद्ध खोपट्यात राहीन पण शहरात

“गड्या आपला गाव बरा”. हो, आहे ना गड्या आपला गाव बरा , पण असा गाव काय कामाचा, जिथे सतत रोजगाराची चिंता लागून राहील? असा गाव काय कामाचा, जिथे सतत जीवनावश्यक गोष्टी, जसे की डॉक्टरी इलाजाची कमतरता असेल? असा गाव काय कामाचा, जिथे तुम्हाला राहायला मोठे घर तर आहे, पण त्यात खायला काही नसेल? असा गाव… Continue reading गड्या आपला गाव बरा विरुद्ध खोपट्यात राहीन पण शहरात

मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय

“मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय” हे काय आपल्यासाठी नवीन नाही. जिथे राहतो तिथे दर एक दोन महिन्यात नवीन वडापाव, मिसळ, अमृततुल्य चे धंदे सुरु होतात. जंगी उदघाटन होते, मोठ्या लोकांना बोलावले जाते ज्यांचा राजकारणी संबंध असतो. नंतर २-३ महिन्यात ते दुकान बंद पडते. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसकट अक्ख्या महाराष्ट्र च चालतं बोलतं स्नॅक्स… Continue reading मराठी माणूस आणि त्याचे बंद पडणारे व्यवसाय

Emi वर मजा करणारी पिढी आणि त्यांची मनस्थिती

पिढ्या ज्या असतात त्या अश्या एकदम झटक्यात बदलत नाहीत. आधीच्या पिढीतील २०% लोक नव्या पिढी प्रमाणे वागतात, वर्षे बदलतात तसे हे प्रमाण ८०% वर जाते, आणि शेवटी १००%. तो पर्यंत पुन्हा एक नवीन पिढी येऊ घातलेली असते. मग पुन्हा २०% – ८०%, हे चक्र असेच सुरू असते. माझा एक मित्र आहे, वयाने माझ्यापेक्षा मोठा. त्याला… Continue reading Emi वर मजा करणारी पिढी आणि त्यांची मनस्थिती

खेड्यातल्या मुली आणि त्यांची स्वप्न

पुण्या मुंबईचं सोडा पण गाव खेड्यातही अशा खूप मुली आहेत ज्या स्वतंत्र विचारांच्या आहेत त्यांना नाही लग्न करायचं. त्यांना नाहीत मुलं जन्माला घालायची. त्यांना फिरायचंय, त्यांना ट्रॅव्हलिंग करायचंय, त्यांना फोटो काढायचेत. त्यांना भारतातल्या लहानसहान गोष्टी जाणून घ्यायच्यायत. त्यांना मित्रांशी गप्पा मारायच्यायत. वाटेत येनाजाणाऱ्यांशी बोलायचंय हवं तेंव्हा कधीही कुठेही जायचंय. त्यांना पण गोव्याला फिरायला जायचंय. गाव… Continue reading खेड्यातल्या मुली आणि त्यांची स्वप्न

कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात

गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडवा म्हणजे शांततेत साजरा होणारा सण, कसली मस्ती नाही, धांगड धिंगा नाही आणि म्हणून कदाचित तरुणाई अश्या सणाना नाक मुरडते. मुळात आपल्यात सणांचे २ प्रकार करायला हवेत.१. धांगड धींगा वाले सण२. शांत सण. दिवाळी ला लक्ष्मीपूजन पेक्षा फटाके फोडण्यात जास्त रस असणे, होळी ला पूजा आणि नैवैद्य सोडून रंग… Continue reading कलियुग आहे, ज्या सणात धांगडधिंगा करता येतो तोच साजरा करतात

Cadaver – कडावर

ही फिल्म कधी आली ते माहित नाही, दक्षिणेतल्या कोणत्या भाषेत आहे तेही माहित नाही पण हिंदी डब मी आज पाहिलं. ही कथा पोस्टमार्टम पासून सुरु होऊन हळूहळू एका ऑर्गन ट्राफिकीकडे कशी वळते ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील नायिका एका शिवगृहात शवाची तपासणी करण्यात निष्णात असते. एका खुणाच्या केस साठी तिला मदतनीस म्हणून बोलावण्यात… Continue reading Cadaver – कडावर

मेंटल हेल्थ को glorify करो पण जरा लिमिट मे.

बऱ्याच डॉक्टर्स की influencers कडून आपण ऐकतो की लहान मूल जर खेळताना पडले तर त्याच्याकडे थोड दुर्लक्ष करा. लक्ष दिले तर ते बाळ रडते, मग तुम्ही त्याला कुरवाळत बसता आणि त्याला तीच सवय होते. मेंटल हेल्थ ही गोष्ट पण मला थोडी तशीच वाटते. म्हणजे एकदम नाहीयेच ही गोष्ट, खोटी आहे, थोतांड आहे असे म्हणत नाहीये… Continue reading मेंटल हेल्थ को glorify करो पण जरा लिमिट मे.

रक्ताचे नाते आणि इतर नाती

We devide this with replaceable and irreplaceable relations. You can deny replaceable relations. उदा. नवरा किंवा बायको हे चार मंत्रांनी एकत्र येणार आणि चार सह्यांनी वेगळे होणारे नाते आहे. एकदा का तुम्ही पार्टनर बदलला तर जुनी नाती नाकारू शकता. तो मेला तर बायको विधवा होत नाही, ती मेली तरी नवरा विधुर होत नाही. हे झाले… Continue reading रक्ताचे नाते आणि इतर नाती

जुन्या आठवणींना उजाळा

खर सांगू का मित्रानो डोळेच पाणावले. पेन मध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आपली पिढी… दुकानदार ही शाईचे थेंब मोजुन पेन मध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे रहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची.कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी… या रांगेतूनच आपल्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई… Continue reading जुन्या आठवणींना उजाळा