Note: या पूर्ण पोस्ट मध्ये आपण त्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या कडे पैसे आहेत.
प्रत्येक बँकांचे वेगळे नियम असतात. त्यांची ग्राहक संख्या, ग्राहकाचा कमाईचा वर्ग, कोणत्या भागात राहतात यावरून बरेच नियम बदलतात. यातलाच एक नियम म्हणजे “कमीत कमी” किती पैसे तुम्हाला बँकेत कायम ठेवायचे आहेत. काही बँकेत २०००, काही बँकेत ५००० तर काही बँकेत १०,००० पर्यंत कमीत कमी पैसे (Minimum Account Balance) आपल्याला ठेवावा लागतो. याला बँकेच्या भाषेत MAB किंवा Monthly Average Balance असे म्हणतात. नावावरूनच हे कळायला पाहिजे की तो average आहे, असे नाही की महिना अखेरीस तेवढं balance असला की झाले.
समजा तुमचा अपेक्षित MAB २००० रुपये आहे. तर तुम्ही पूर्ण महिनाभर त्याचा average maintain केला पाहिजे. म्हणजे त्यात तुम्ही आधीचे १५ दिवस १०००० ठेवले आणि उरलेले १५ दिवस १००० रुपये ठेवले तर सरासरी महिनाभर तुमच्या अकाउंट मधे २००० रुपये होते असे गणित बसते.
पैसे आहेत पण भरायचे नाहीत किंवा कंटाळा
पूर्वी काय व्हायचे, की सगळ्याच कामाला बँकेत जायला लागायचे. पैसे भरणे, काढणे, फक्त balance check करणे इत्यादी. त्यात माणूस वेळे अभावी किंवा कंटाळा म्हणून बऱ्याच गोष्टी लांबवायचा. सध्याच्या काळात सगळ्या गोष्टी मोबाईल वरून सेकंदात होतात. या अकाउंट वरून त्या अकाउंट वर पैसे टाकणं हे पापणी मीच्कवण्या इतकं सोपं झालंय.
अश्यावेळी लोक फक्त कंटाळा, किंवा त्या अकाउंट ला पैसे नाही टाकायचे म्हणून टाळाटाळ करतात. आणि मग महिन्याकाठी भुर्दंड बसतो. बँकेकडून येणाऱ्या प्रत्येक sms मधे आपला balance दिसत असतो, किंवा आपण मोबाईल ॲप वरून तो सहज check करू शकतो. पण लोकांना ते ही करायचे नाही.
एका अकाउंट मधे २५ ते ३० हजार ठेवणारे लोक दुसऱ्या अकाउंट मधे २००० टाकायला कंटाळा करतात. असे असेल तर ते अकाउंट बंद तरी करा. आणि सुरू ठेवायचे असेल तर दिवसातल्या reels scroll करायच्या busy schedule मधून ३० सेकंद काढून पैसे transfer तरी करून घ्या.
तुमच्या कडे २५,००० जर एका अकाउंट मधे असतील, आणि इतर अकाउंट चा minimum balance २००० असेल तर त्यात महिन्याचे १५ दिवस १०,००० ठेवा, आणि पुन्हा ते वापरून टाका. किंवा वापरायचे नसतील तर पुन्हा आपल्या आधीच्या अकाउंट मध्ये ते ट्रान्सफर करून घ्या. त्यात तुमचा कमीत कमी २००० balance कायम maintain राहील.