लग्नाचा बाजार हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाहीये. लग्नाच्या बाजारात आई – वडील आपल्या मुलींसाठी एक पैसेवाला वर (अर्थात त्यांच्यासाठी जावई) शोधत असतात. मुलगी आपल्याला स्वप्नातला राजकुमार अर्थात पैसेवाला नवरा मिळावा असे स्वप्न बघते. तर मुलीचा भाऊ अथवा बहीण आपला जीजू पैसेवाला असावा जेणेकरून आपल्याला सगळ्या ठिकाणी मोठायक्या चोदता येतील असे वाटते.
तथाकथित नातेवाईकास असा पैसेवाला नवरा, जावई आणि जीजू मिळाल्यावर त्यांच्या वागणुकीत काय बदल झाले, ते आपण इथे बघू. (हो रे माणुसकीच्या चोदया, चुगल्या करतोय मी इथे, घे उपटून काय उपटायचं ते).
पैसेवाला नवरा
नाही हो, पोरगी बोलायला तयार नाही आता. जसे लग्न झाले, तसे सगळीकडे माझा नवरा दिसायला कसा राजबिंडा, उंच आहे याची मोठयाकी आधी चोदून झाली. मग आमचे घर कसे मोठे आहे, त्यात खालच्या मजल्यावर ८ आणि वरच्या मजल्यावर ५ रूम आहेत. टेरेस वर आणि खाली सुद्धा मोठी जागा शिल्लक आहे. गावात अजून एक २-३ मजली घर घेतले आहे. लवकरच आम्ही वेगळे होऊन तिथे राहायला जाऊ.
अरे हिला नवरा दिवसभर पदर पडू देत नाही. कोणी बाहेरचे आले की आम्ही इज्जतदार लोक म्हणून हिला बाहेर निघू देत नाहीत. एवढ्या मॉडर्न जमान्यात अगदी खेड्यात राहायला लागतेय. मॉडर्न कपडे घालून सोडा, अगदी साडी घालून सुद्धा गावात फिरू शकत नाही. घरीच राहायला लागते. गावी राहून २ वर्ष झाली, अजून त्या खेड्यातले रस्ते माहित नाहीत हिला. शिवाय थोडं भांडं पडलं तरी नवरा अगदी गावठी शिवीगाळ आणि मारहाण करतो.
पैसेवाला जावई
आई – वडील पंचक्रोशीत सांगत फिरत आहेत, की समाजातल्या एक्दम प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी आम्ही पोरगी दिली. जावई कसा राजबिंडा आहे. शिवाय गावात मोठे घर, व्याही प्रतिष्ठित आहेत, सतत लोकांची ये-जा असते घरात. झाटभर आजारी पडले तरी ५० लोक बघायला येतात; वैगरे.
अरे पण तुमची पोरगी सतत तिथे चहा-पाणी च करत असते. दिवसभर लोकांची ये-जा असते, काहीतरी जेवून पण जातात, त्यांचीच उष्टी भांडी घासत असते. मोठ्या घरी पोरगी दिली पण ती तर मोलकरीण होऊन बसली आहे तिथे. शिवाय तुमच्या घरी तिने अश्या एकही कामाला हात लावलेला नव्हता. तुमच्या स्वतःच्या घरी मोलकरीण होती कपडे धुवायला, तिथे ती स्वतः कपडे धुते अक्ख्या एकत्र कुटुंबाचे.
पैसेवाला जीजू
आमच्या जीजूंकडे कार आहे, रहात आहेत ते घर असे मोठे आहे. शिवाय अजून एक ३ मजली इमारत विकत घेतली आहे. वेगळे होतील तेव्हा तिथे लवकरच राहायला जातील. जवळच्या जिल्ह्याच्या गावी पण शेती घ्यायचे सुरु आहे. सगळे नोकरदार आहेत. मजबूत पैसे आहे त्यांच्याकडे. महिन्याला पार्टी करायला जातात. शिवाय घरातल्या स्त्रियांना पाहिजे तेवढे कपडे घेतले जातात, सोने नाणे पण भरपूर करतात.
अरे भाई, एवढी भंगार गाडी, माहित नाही सेकंड हॅन्ड आहे की ५-६ लोकांकडे फिरून आलीय, तिला तू कार म्हणतो. जे राहते घर आहे, ते कधीकाळी पूर्वजांची जमीन विकली होती, त्यातून उरलेल्या पैश्यात घेतले होते. मुंबई पुण्यात तेवढ्या पैश्यात एक बाथरूम सुद्धा मिळणार नाही. ३ मजली जी इमारत विकत घेतली आहे, तिचे बँकेचे हफ्ते ३ पुरुष मिळून फेडत आहेत, ते पण खेड्यातल्या इमारतीचे. इथे मुंबई पुण्यात लोक फ्लॅट चे हफ्ते एकट्याने फेडतात. त्यात तुमची काय बढाई? महिन्याला पार्टी करायला जातात, आणि महिनाभर तर घरातल्या स्त्रियांना मोलकरीण सारखी वागणूक असते. चांगले कपडे आणि दागिने घेऊन फायदा काय जर ते घालून गावात कुठे मिरवता येत नसेल तर?
एकत्रित
एकूण एक बघायला गेले तर तुम्ही सगळे तोट्यात आहेत. जावयाचा स्वभाव असा आहे की “जवाई जम, कुत्ते से कम” ही म्हण त्याला तंतोतंत लागू पडते. त्याला कितीही मानपान दिला तरी शुल्लक गोष्टीवरून तो लगेच तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतो. तुम्ही त्याचा कितीही आदर सत्कार केला; त्याच्या घरी कितीही काम केले, तरी ते तुमचे कर्तव्य आहे, कारण तुम्ही मुलगी दिली आहे, असे तर त्याचे विचार आहेत. मग तुम्ही कश्याच्या जोरावर एवढ्या फुशारक्या मारता?
तुमच्या घरी काय किस्से घडतात, काय नाही याच्याशी मला काही देणे घेणे नाही. पण उगाच नको त्या ठिकाणी आमच्याशी तुलना नको. तुमचा पैसा तुमच्याकडे, तुमचा तोरा तुमच्याकडे.
आम्ही गरीब आहोत पण तुमच्या पोरींपेक्षा आमच्या घरातल्या सुनांना जास्त स्वातंत्र्य आहे. आमच्याकडे दागिने किंवा कपडे कमी असतील, पण जेवढे आहेत तेवढे घालून त्या मिरवतात. शुल्लक सोडा, कधी खूप मोठा चुका आणि नुकसान होऊन सुद्धा कधी आम्ही घरच्या स्त्रियांवर हात उगारला नाही की मनात राग धरला नाही. आमच्या कडे कार नाही पण जी दुचाकी आहे, ती स्वकमाई वर नवी घेतलेली आहे; कोणाच्या बापाचे गिफ्ट नाही. घर घेऊ, स्वकमाई वर घेऊ, तुमच्यासारखे वडिलोपार्जित जमिनी विकून नाही.
शिवाय घरात लागते त्या सगळ्या गोष्टी आहेत. सुई पासून वॉशिंग मशीन पर्यंत सगळे. थोड्या दिवसात डिशवॉशर पण येईल. घरात रिकामचोट लोक येत नाहीत. त्यामुळे घरातल्या स्त्रिया मोलकरीण सारख्या दिवसभर उष्टी भांडी न धुता इतर चांगल्या गोष्टी करत असतात.
यांची वागणूक आता पूर्णतः बदलली आहे. कधीकाळी फोन करून हाल-हवाल विचारणारे आता विचारत नाहीत. समोर गेले तरी बोलत नाहीत. आमच्या मागाहून आमच्या गरिबीची चेष्टा इतर लोकांकडे करतात. बरं आपल्याला त्यांचा एक फोन यावा ही अपेक्षा पण नाही. पण ते इतर ठिकाणी आपण कसे हीन आहोत, गरीब आहोत, याची चर्चा करतात म्हणून राग येतो. यांच्या पासून त्यांचे सख्खे नातेवाईक सुद्धा दुरावले आहेत. ते लोक स्वतः येऊन आपल्या जवळ त्यांचे रडगाणे सांगत असतात. शिवाय हे लोक आपल्या विषयी काय विचार ठेवतात हे सुद्धा त्याच लोकांकडून कळते. एक दोन वेळा प्रत्यक्ष वागणूक पण हीन दर्जाची मिळाली तेव्हा त्या इतर लोकांवर मला विश्वास बसला.