Hypocrisy की भी सिमा होती है

दुपारी चहा प्यायला गेलो होतो. तिथेच एक जण येऊन तो लिंबू पाणी मागू लागला. मी चहा मागू लागलो ते बघून तो बोलला की एवढ्या भर दुपारी चहा प्यायला कसं होतंय? त्यानंतर तो बोलला की जास्त चहा पिऊन तब्येतीवर परिणाम होतो वगैरे वगैरे आणि मी बघ कसा लिंबू पाणी पिणार आहे असे तो बोलत होता.

थोड्याच वेळात त्या टपरीवाल्याने सांगितले की फ्रिजमध्ये लिंबू पाणी नाहीये आणि जे बाहेर लिंबू पाणी आहे ते थंड नाहीये त्यामुळे जर प्यायचं असेल तर तुम्हाला हेच लिंबू पाणी प्यायला लागेल त्यावर तो म्हणाला की गरम लिंबू पाणी कसं प्यायचं त्यापेक्षा मला एक सिगरेट दे, मी सिगरेट पितो आणि एक चहा कटिंग दे.

Hypocrisy की भी सिमा होती है

तोपर्यंत माझा चहा अर्धा पिऊन झाला होता. त्याने सिगरेटचे नाव काढताच मी एक जळजळीत कटाक्ष त्यावर टाकला थोबाड खाली करून सिगरेट पीत होता मा;दरचो:त.

Leave a comment