मेंटल हेल्थ को glorify करो पण जरा लिमिट मे.

बऱ्याच डॉक्टर्स की influencers कडून आपण ऐकतो की लहान मूल जर खेळताना पडले तर त्याच्याकडे थोड दुर्लक्ष करा. लक्ष दिले तर ते बाळ रडते, मग तुम्ही त्याला कुरवाळत बसता आणि त्याला तीच सवय होते.

मेंटल हेल्थ ही गोष्ट पण मला थोडी तशीच वाटते. म्हणजे एकदम नाहीयेच ही गोष्ट, खोटी आहे, थोतांड आहे असे म्हणत नाहीये मी. पण तुम्ही तिला कुरवाळत बसलात मग तर झालेच.

पूर्वी अश्या गोष्टी दाबून टाकल्या जायच्या. लोक त्याच pressure मधे आयुष्य काढायचे. आता बाहेर टाकायला वाव मिळतोय तर bc सगळेच चाललेत depression मधे. अरे सुविधा असली की ती वापरायचीच असे काही compulsary नाही.

काहीही झाले की त्याला मेंटल हेल्थ च नाव देऊन कुरवळणे मनाला पटत नाही. थोड स्ट्रगल करू द्या ना. लगेच त्याला हेल्प करायला जाऊन त्याला लगेच समजून घेऊन त्याला त्याच्या strength वापरूच देत नाहीत. Develop होऊच देत नाहीत. त्याला मिळमिळीत करून ठेवतात. सतत त्याचे प्रॉब्लेम्स सोडवत बसतात.
मग हीच पोरं पुढे जाऊन मार्क्स कमी आले की दरवाजा लाऊन घे, आयफोन नाही मिळाला की आ’त्मह:त्या करायचा प्रयत्न, KTM नाही दिली की घर सोडून गायब होणे किंवा जेवण बंद करणे. असे प्रकार करतात.

मेंटल हेल्थ ही गोष्ट खरी आहे १००%. पालक आता समजून पण घेऊ लागले आहेत या गोष्टी. पण याच मेंटल health मुळे होणाऱ्या घटना कमी झाल्या का? उलट वाढलेल्या दिसत आहेत. म्हणजे समजून घेणारी पिढी आली तर त्यांना अजूनच फावले असे दिसतेय. कुठलीही गोष्ट मेंटल health च्या under टाकायला लागलेत.

टीप: कुठल्याही survey chi लिंक नाहीये.

Leave a comment