त्यावेळी खरंच खूप तंगी होती. अगदी २ रुपयाचा पेन घेतला तरी हिशोब ठेवायला लागे. कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी आहोत; स्वतःला updated ठेवायचे म्हणून २ आठवड्यात एकदा सायबर कॅफे ला जात असायचो. २० रुपये तासाने तिथे ते मिळायचे. प्रिंट चे १०, कलर प्रिंट चे ३०, स्कॅन चे १० रुपये प्रति पेज प्रमाणे भाव असायचा.
अश्यात आम्हाला कळले की एका माणसाच्या मुलीला जी ४-५ वर्षाची होती, तिला हृदया चा विकार होता. त्यावेळी ketto वैगरे तसल्या NGO कोणाला माहीतच नव्हत्या. शिवाय इंटरनेट बँकिंग वैगरे तर खूप लांब. साधे एटीएम कार्ड सुद्धा लोक घरी ठेवायचे आणि पिन तर विसरलेला च असायचा. अश्या काळात समोर असताना पैश्याला नकार देणारे लोक ऑनलाईन कसे पैसे देतील देव जाणे.
त्या मुलीला मदत मिळवून द्यायचा आम्ही ठेका घेतला. १० मित्रांनी पैसे जमवून तिचे reports स्कॅन करून घेतले. ते reports पुन्हा सगळ्यांच्या mail ला forward करून घेतले. आता शोध सुरू झाला अश्या लोकांचा की कोण यासाठी पैसे देईल. मग त्यात मेल आयडी शोधण्यापासून पासून कोणताही random search आम्ही करायचो. त्यात इंटरनेट जबदस्त गरिबीत वाढले असल्याने आम्ही १ तासात जेमतेम ८-१० वेबसाईट ओपन करू शकायचो. इंटरनेट एक्सप्लोरर होतेच १०० वेळा hang व्हायला.
आमच्या पैकी कोणी ना कोणी दर २-३ दिवसाला जाऊन वेगवेगळ्या गोष्टी search करत असे. असे साधारण महिनाभर चालले. त्यात त्या मुलीचे वडील सतत मिस कॉल देऊन आम्हाला कॉल करायला लाऊन काय झाले, मिळतील का पैसे म्हणून विचारायचे. माझ्या पोरींचे reports वापरून तुम्ही दुरुपयोग तर नाही ना करणार, आतल्या आत पैसे तर नाही ना खाणार असा साधारण त्यांचा सुर असायचा.
महिन्या भरात आम्ही कंटाळलो, मुळात अश्या तंगीत सारखे कॅफे ला जाणे सुद्धा परवडत नसायचे. हळू हळू १०-१२ लोकांमधून आम्ही २-३ जण उरलो. मग थोड्या दिवसात आम्ही पण नाद सोडला.
काळानुसार गोष्टी इतक्या सोप्या होत जातात की त्याकाळी आपण साध्या साध्या गोष्टी साठी जो स्ट्रगल केला, ते कोणाला सांगायच्या लायकीचे राहत नाही. त्यात आपण जे केलेय ते आज किती worthless आहे याची जाणीव होत राहते. शिवाय आज इतके सोपे झाले आहे आणि त्याचा होणारा (फालतू) उपयोग पाहून मनातल्या मनात त्रास जास्त होतो.