आम्ही तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय खाली देत आहोत. लक्ष देऊन वाचा आणि त्रास होत असेल तर हे उपाय आपण अमलात आणू शकता.
तोंडातील फोड घालवण्यासाठी घरगुती उपाय :
● लसूण : तोंडात येणाऱ्या फोड्यांच्या इलाजासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15 मिनिटांनी ती पेस्ट धुवावी. लसणात असलेल्या अँटी-बायोटिक गुणांमध्ये फोड्या लवकर बऱ्या होतात.
● टी ट्री ऑयल : टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. फोड्यांवर हे तेल लावल्यास फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड्या असलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो.
● बर्फ : बर्फाचा वापर फोड्यांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.
● दूध : दुधाचा वापर दुधामध्ये कॅल्शियम असतं, जे फोड्यांच्या व्हायरसोबत लढण्याचं काम करतं. शिवाय कॅल्शियममुळे झीजही लवकर भरण्यास मदत होते. कापूस थंड दुधात भिजवून फोड्यांच्या ठिकाणी लावावं.
● कोरफड : कोरफड फोड्यांवर कोरफड लावल्यास जळजळ कमी होते. त्याचसोबत कोरफडमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जखम भरण्यास मदत करतात.
खूप छान माहिती दिली.
LikeLike