नेहमी जेवतो त्या मेस चा मालक लातूर चा आहे. ३ भाऊ, त्यांच्या बायका. पोरं पण आहेत. पूर्वी मेस मधे च काम करायचे सगळे आता त्यांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले.
१ जोडपे जे आहे त्यात बायको थोडी शिकलेली वाटते. ते तिला दिवसभर गल्ल्यावर बसवतात, सगळी बिल, पार्सल ऑर्डर बाहेरचे ती बघते. तो स्वतः माणूस किचन मधे भाज्या गरम करतो, चपाती साठी बाई लावली आहे. २ पोरं वेटर म्हणून आणलेली आहेत जी रात्री तिथेच झोपतात.
दुसऱ्याने तिथे बाहेरच इडली डोसा सुरू केला, फक्त सकाळी १० पर्यंत. तिथून पुढे तो पान टपरी बघतो, सिगरेट पॉइंट आहे, जबरी धंदा होतो. त्याची बायको दिवसभर लहान पोरांना बघते, तिघांची पण मुलं आहेत. तिचेच मुल लहान आहे म्हणून ती घरी असते. आणि पर्यायाने इतरांवर पण लक्ष ठेवून होतें. घरात वॉशिंग मशीन असल्याने कपड्यांचे टेन्शन नाही, सगळे मेस मधेच जेवतात म्हणून भांड्यांचे टेन्शन नाही.
तिसऱ्या भावाची बायको सकाळी डोसा वाल्याला मदत करते. चटणी बनवणे, पीठ बनवणे, इडली बघणे वैगरे. दुपारी एका क्लॉथ शॉप च्या बाहेर बसून कपडे alter करून देते. तिचा नवरा टेम्पो चालवतो. रोज स्वतःची मेस आणि इतर मेस साठी भाजीपाला आणून देतों. पान टपरी वाल्याला त्याचे साहित्य आणून देतो.
हे सगळे दुपारी जसे जमेल तसे मेस मधेच जेवून जातात. रात्री मेस बंद केली की ११ वाजता सगळे एकत्र जेवतात. २ वेटर पोरं तिथेच झोपतात, आणि हे सगळे ३ जोडपे त्यांच्या १ bhk मधे झोपायला जातात.
शिक्षणाचा आणि परिपक्वतेचा काही संबंध नाही
पैसा कमावण्यासाठी डिग्री ची गरज नाही, women empowerment इथे पण होतेय. स्वतःचा संसार समजून नवऱ्याला मदत, नुसते घरी बसून मागण्या नाहीत. सगळे भाऊ एकत्र राहतात म्हणून मदत पण होते, एकत्र राहण्यात बायकांचे योगदान जास्त आहे.
शिकलेल्या लोकांमध्ये या गोष्टीची कमतरता आहे.