एक family ग्रुप आहे, ज्यात एखादा update आला की त्याचं घरातले लोक दखल घेतात बाकीचे jhat रिप्लाय देत नाहीत.
उदा. त्यात एखाद माणसाने फोटो टाकले की ते अमुक तमुक नेत्याला जाऊन भेटले तर त्यांचेच मुलं मुली, जे एकाच घरात राहतात तेच अभिनंदन करतात.
आता तो सेम तीच व्यक्ती काश्मीर ला चाललीय फिरायला, बॅग्स सोबत family फोटो टाकत आहेत. तिथे त्यांचेच मुलं – मुली “हॅपी जर्नी पप्पा” म्हणून टाकत आहेत.
आपलेच दात, आपलेच ओठ.
याच ग्रुप मध्ये मागे तिथल्या चुलत भावंडात त्यांच्या त्यांच्या आई कडच्या नातेवाईकावरून भांडण झालेले, तेव्हापासून तर स्मशान शांतता असते या ग्रुप वर. ज्याच्या नातेवाईकाचा वाढदिवस असतो, तेवढेच लोक त्याला शुभेछया देतात, बाकीचे नुसते गम्मत बघतात.
फक्त स्त्रियांचे आणि मुलींचे गुणगान
या ग्रुप मध्ये जे लोक आहेत, जास्तीत जास्त लोकांच्या घरी मुलीच आहेत. मुलं जन्माला आलीच नाहीत. त्याच गोष्टीमुळे तिथे सतत मुलीचे जीवन असे, बाईचे जीवन असे, तिला बापाचे अंगण सोडून दुसरीकडे जावे लागते. स्त्रीचे जीवन खूप खडतर असते, ती दोन्ही घरे कशी सांभाळते, ज्यांना मुलगी नाही त्यांनी मागच्या जन्मी पाप केले असेल अश्या आशयाचे WhatApp फॉर्वर्डस इथे ते लोक पोस्ट करत असतात.