पेस्ट कंट्रोल चा आमचा धंदा नरमला की आम्ही अश्या चांगल्या सोसायट्या हुडकून त्यात मुद्दाम २-३ ढेकूण सरकवून येतो.
एकदा इमानदारीने एका फ्लॅट वर पेस्ट कंट्रोल चे काम सुरू होते. तिथे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या त्या फ्लॅट मालकाचा मित्र आला. चौकश्या करू लागला, नको त्या शंका. म्हणे पुन्हा झाले तर? वारांटी, ग्यारंटी? पॅकेज खूप महाग आहे, लुटायचे धंदे आहेत वैगरे.
लुटायचे धंदे तो बोलला आणि चहाचा घोट माझा तिथेच अडकला. मनातल्या मनात ठरवलं, या शेमन्याला घेतोच आता. प्रेमाने त्याच्याशी साहेब वैगरे बोलून त्याचा फ्लॅट number काढला. जसे आमचे काम संपले तसे त्याच्या floor ला जाऊन त्याच्या फ्लॅट च्या बाहेर थांबलो. दरवाज्याला ग्रिल लावलेले होते. माझ्याकडचे स्टॉक मधले २-४ मोठे ढेकूण घेतले आणि हळूच ग्रिल मध्ये सरकवून दिले.
आज १५ दिवस झालेत, त्याच्या कडेच चाललोय पेस्ट कंट्रोल करायला.