आताच एका मित्राशी मी बोललो त्याने त्याच्याकडे बायकोचे मिस करेज झाल्याचे सांगितले. ते ऐकून झाल्यानंतर गाडीवरून येत असताना मला एक प्रेग्नेंट मांजर दिसली. ती मांजर मला आडवी न जाता एका जागेवर उभा राहूनच माझ्याकडे एकटक बघत होती आणि मी गाडीवरून तिच्याकडे बघत बघत पुढे सरकलो. तिचं ते मोठं पोट बघून मला कुतूहल वाटले.
पण लगेचच माझ्या मनात शंका दाटून आली आणि मी ती मांजर रस्ता क्रॉस करेपर्यंत तिला मागे बघतच राहिलो कि ती सुखरूप क्रॉस करते की नाही.
माझा एक प्रश्न असा आहे की प्रेग्नेंट मांजर बघणे हे शकुन आहे की अपशकून??
गरोदर असलेली मांजर माझ्याकडे एकटक बघत होती
परवा पाहिलेल्या त्या मांजरीच्या रंगाचे पिल्ल काल पाहिले. तिचे नसतील कारण ते थोडे मोठे वाटत होते. काही GenZ पोरांनी त्या पिलांना दूध पाजायचा ठेका घेतला होता. दूध कमी पाजत होती, फोटो जास्त घेत होती.
फोटो घेऊन लगेच स्नॅप, इंस्टा ला जात होता. अरे त्या प्रियांका ने लव्ह react केले असे एकजण बोलला.
मी पण फोटो घेणार होतो, तुम्हाला इथे दाखवायला. पण माझ्या boomer मनाने मला परवानगी नाही दिली.
मी गाडी फिरवून तिथे गेल्यास पोरं म्हणाली – “काका, तुम्हाला न्यायची का?”
पोरं: आई नाही माहीत, कोणीतरी इथे सोडून गेले. ४ पिल्ल होती, २ नेली एकाने. आता २ राहिली. तुम्हाला न्यायची का?
मी: नको.
जड अंःकरणाने मी तिथून काढता पाय घेतला.
Pregnant Cat looking at me