गणपती विसर्जन
हे बघ भा(व)ड्या, इथे माझ्या घरी येऊन माझेच माप काढायचं काही काम नाही. हा chadarmod इथून ५०० किमी वर राहतो. गणपती आले की दर्शनासाठी पुण्यात येतो. पुन्हा मलाच टोमणा मारतो.
तो: मी बाहेरून येऊन पण मला दर्शन भेटले. आणि तुला भेटत नाही व्हय, तू मुकलास भावा.
मी: गणपती तोच असतो भावा, तू गणपती च दर्शन घ्यायला थोडेच आलास. Decoration बघायला आलेला.मी सिंहगड रोड ला जातो रोज, मला रोज दर्शन घडते दगडूशेठ चे.
तो: अरे पण खरी मजा आता असते.
मी: तुमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या मुळे गर्दी होते, आणि मग आमच्यासारख्या इथे राहणाऱ्यांना त्रास होऊन दर्शनास मुकावे लागते.
पुढच्या वर्षी येत नसतो हा आता.
गावाच्या मुलांचे शहरात शिक्षण, पैसे आणि व्यसन
भाऊ: हॅलो, तुझ्या पोराला कोणत्या शाळेत पाठवतो? माझ्या पोराला पण घेऊन जा की. इथे गावात वळण लागत नाही त्याला. दिवसभर नुसता खेळतो, त्याच्या वयाचे सगळे मुलं तमाकु खायला लागली. थोड्या दिवसांनी दारू पण पेतील. हे पण लागेल त्याच्या नादी… फी चे पैसे होणार नाहीत बघ, तुझाच समजून भर पैसे.
वहिनी (सगळ्या गावाला): आमच्या पोराला शिळं खायला घालतात. काम लावतात. दूध, भाजी घ्यायला पाठवतात. जरा कुठे गेला की रागावतात मारतात.
बायको (गावाकडून चुगली कळल्यावर): बघा, आपण आपला समजून एवढं खर्च करतो पण ते असे बोलतात.
भाऊ: अरे छोट्या, काल पोराला मारलस की? बघ तुझ्या पोराला काय करायचं ते कर, माझ्या पोराला हात नाही लावायचा.
वहिनी (सगळ्या गावाला): बाई बाई बाई, आम्ही तर इकडे होतो. पोराला यांच्या भरोश्यावर तिथे ठेवलेले शिकायला. पोरावर लक्ष दिले नाही. आता मुलगा दारू प्याला लागला, सिगारेट फुकु लागला. आता काही खरं नाही बाई, आम्ही तर बरबाद झालो यांच्या पाई.
शहरी माणसाचा पगार आणि लाविश लाईफ बघून गावकडला माणूस:
तुमचीच मजा आहे गड्या. आम्ही काय इथ शेतात वर्षभर राबतो. पण पैसा काहीच नाही. तुमचं महिन्याला फिक्स पगार असतो. सरकार बी काय करत नाही आमच्यासाठी. तुमच्याकडे चिकने रस्ते. भारी कपडे, पाहिजे तेव्हा नवीन मोबाईल, कपडे खरेदी करता. कार मध्ये फिरता.
तोच माणूस: काय झाटू जिंदगी रे, खायला वेळ नाही म्हणून वडापाव खाता. जेव्हा बघावं लोकल मध्ये, राहायला खोप्यात राहता. आम्ही बघ, मोठी वाडी, शुद्ध हवा, शुद्ध पाणी. आमचा sperm count high असतो बघ.
हॅलो,
सोसायटी च कर्ज फेडायच आहे, ४० हजार कमी पडत आहेत. ही भरली की पुन्हा मिळेल, मग तुझे परत देतो.
३ वर्ष झाले आता अजून दुसरी सोसायटी घेतली नाही वाटते.