“बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला”
का येईल हो बंधू, घेतला ना बाप हिस्सा. तुमच्या घरीच रहा आत्या. आम्ही येतोय का तुमच्याकडे आहेर मागायला?
एकदा बाप हिस्सा घेतल्यावर दोन भाऊ आपापला संसाराचा गाडा स्वतः रेटतात. ते एकमेकांच्या संसारात, व्यवहारात सहसा लुडबुड करत नाहीत. पैश्यासाठी, मदतीसाठी तगादा पण लावत नाहीत.
पण अश्यात आत्या नावाच्या ज्या गोष्टी असतात त्या भयानक त्रासदायक असतात. बाप हिस्सा घेऊन सुद्धा त्याचे काही ना काही देणेघेणे असतेच. जर या देण्याघेण्याला प्रेम आणि संस्कृती म्हणत असाल तर मग बाप हिस्सा घेणे ही कुठली संस्कृती?
आत्त्याचा बाप हिस्सा
सतत काही ना काही कामासाठी तगादा असतो. आधी तिची पोरं शिकवायची, त्यांची लग्न लावून देताना मदत करायची. मग तिच्या मुलीला मुलगा, मुलगी झाली की त्यांचे पोषण, शिक्षण साठी इकडे तगादा. आत्याच्या मुलांचे लग्न झाले की त्यांचे पण काही ना काही असतेच. लग्नात मदत करा, पुन्हा त्यांना पोरं झाली की मदत करा.
हेच करत राहायचे का माणसाने आयुष्यभर? एक एक माणूस असतो तो स्वाभिमानी असतो. आपली बहीण किंवा आत्या जशी इथे माहेरी पैश्यासाठी तगादा लावते, तसा तो त्याच्या सासरी एक रुपयाही मागायला जात नाही. उलट त्याच लोकांना याच्या मदतीची गरज पडून जाते.
आत्त्याची नातवंडं आता जॉब ला आहेत तरी आमच्याकडे काही ना काही पैश्यासाठी तगादा असतोच. नातवंडांच्या शिक्षणाला पैसे मागितले. थोड्या दिवसांनी त्यांच्या लग्नाला पण मागणार. आम्ही आमची पोरं शैक्षणिक कर्ज घेऊन शिकवतो. किती पिढ्या पोसायच्या? आमची पण पोरं आहेत, त्यांना पण शिकून जॉब लागेल तेव्हा त्यांच्या कडे पण मागायला कमी करणार नाहीत.
प्रेम म्हणजे नुसते भावाच्या पिढ्याकडून पैसा हडपणे असेल तर कसले आलेय प्रेम?