दुरुस्त आये, पण खूप च लेट आये

गावा कडल्या भावकीतल्या भावाला खूप वेळा बोललो की graduation तरी करून घे, डिप्लोमा आहेस फक्त. तेव्हा त्याने ऐकले नाही. कॉलेज मध्ये lab assistant आहे तो.
दोन वर्षापूर्वी तिसऱ्यांदा जेव्हा त्याचे promotion नाकारले गेले तेव्हा त्याला जाग आली आणि आता या वयात graduation करतोय. कालच माझ्या कडून फायनल चा वेब बेस्ड प्रोजेक्ट नीट करून घेतला त्याने. मी पण लगेच करून दिला, त्याला त्याच्या चुकीची आठवण न करून देता.

दुरुस्त आये, पण खूप च लेट आये.

Leave a comment