खेडेगाव विरुद्ध शहर

समाधान उर्फ समड्या हा खेड्यातला. त्यांचं गाव डोंगराच्या पायथ्याशी, पावसाळ्यात नुसत्या सरी वर सरी असायच्या. मोठं कुटुंब असल्याने घरातले सगळे पुरुष पडत्या पावसात हिरीवर अंघोळ करायचे, जाम थंडी. समड्या विचार करायचा. शहरात कसं मस्त बाथरूम मध्ये गरम पाण्याचा शॉवर अस्तूय. काय मजा असेल ना शहरात, म्हणजे पैश्याच सुख आणि पावसाचं बी.

समाधान उर्फ Sam, पुण्यातला. सगळीकडे नुसती गर्दी कुठेच एकटे बसायला मिळत नाही. गर्दी असून काय फायदा, आतून तर एकटाच आहे. शॉवर गरम पाणी ओकत होता आणि त्यात हा रडत होता. च्यायला या शॉवर मध्ये मोठ्याने रडता सुद्धा येत नाही. पप्पांचा मळवली ला वैगरे फ्लॅट असता तर शनिवार रविवार तिकडे जंगलात जाऊन मनसोक्त पावसाच्या सरी अंगावर घेत मोठ्याने रडता आले असते.

Leave a comment