अरे भावा Engineering करून अमृततुल्य चा साईड बिझिनेस टाकलास म्हणजे उपकार नाही करत कोणावर. थोडे इंटिरिअर करून, त्यावर मी इंजिनिअर वैगरे टाकून सहानुभूती मिळेल. पण तुझा चहा सुमार दर्जाचा आहे. तुझ्या चहा पेक्षा टपरी वरचा चहा सरस आहे, फक्त त्याची कप गरीब आहेत बाकी काही नाही.
आणि त्याच भिकार चहा ला २-३ वेग वेगळी नावे देऊन, त्याला flavour टाकून तुझा customer attract होत नाही. पैसे देऊन भपका करणार customer तिथे CCD किंवा StarBucks ला coffee पितो. इथे तुझ्या १० बाय १० च्या खोलीबाहेर उभा राहून चहा पित नाही तो. तुझा कस्टमर बेस १० पासून २० पर्यंत जास्तीत जास्त, साधारण सतत चहा पिणारे किंवा कामगार वर्ग, त्यांना काय करायचे आहे तुझ्या डिग्री चे आणि तुझ्या IT कंपनीतल्या designation चे?
एवढे शिकून तुला त्या डिग्री ला शोभेल असा जॉब मिळवता किंवा टिकवता आला नाही. इंजिनिअर असून चहा विकतो म्हणून काय उपकार नाही करत. तुझ्यात आणि अशिक्षित चहावाल्यात काय फरक? एखादा इंजिनीरिंग चा बिझनेस किंवा अंबानी सारखा मोठा बिझिनेस होईल तेव्हा दाखव attitude.
ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्याच्या पाट्या कश्याला लावता?