आयफोन घेतल्याचे दुःख

माझ्या ऑफिस मधे मी Manager आहे. एक ज्युनिअर जॉईन झाला team मधे. त्याच्या कडे आयफोन होता. ज्या दिवशी त्याच फोन वाजला लगेच TL असलेल्या माझ्या मित्राने मला खुणावले. इज्जत राहायला पाहिजे म्हणून pressure मधे येऊन मी पण आयफोन घेतला. Instagram ला Reel पण टाकली.

आयफोन घेतल्याचे दुःख

आता दर महिन्याला एक एक्स्ट्रा EMI वाढला आहे. होम लोन सांगून नातेवाईकांना गप्प केले होते, ते आता आयफोन बघून पैश्यासाठी तगादा लावत आहेत.

डोकेदुखी साठी डॉक्टर कडे गेलो होतो त्याने लगेच MRI करायला सांगितले, reports normal आहेत.

हॉटेल ला जेवायला गेलो. वेटर साठी २० रुपये टीप ठेवली. “जाऊदे रे, EMI वर घेतला असेल” अशी टिप्पणी माझ्या कानावर पडली.

AC स्लीपर बस मध्ये बसलेलो, आयफोन वाजल्यावर ड्रायव्हर बोलला, काय साहेब, ड्रायव्हर ठेवा एक, स्वतःच्या गाडीने जा गावी.

Dmart ला गेलो, तिथे payment करताना cashier बोलली, काय साहेब, Dmart गरीब लोकांसाठी आहे, तुम्ही Elite लोक इथे कश्याला येता.

लग्नात गेलो होतो, ५०१ रुपये दिले पाकिटात, नंतर पाहुण्यांनी फोन करून विचारले. काय Manager साहेब, EMI मधेच जात आहेत सगळे पैसे, खूप आवरता हात घेतला आम्हाला देताना.

कोकणातल्या मित्राने १८०० ची हापूस पेटी २४०० ला दिली. नंतर कळले की तो दुसऱ्यांना १२०० ला सांगून १००० ला सोडतो.

पेट्रोल भरताना पंप वाले डायरेक्ट टाकी फुल्ल करायला घेतात, काल गाडी ठेऊन घेतलेली थोडा वेळ कारण क्रेडिट कार्ड चालले नाही.

ऑफिस मधल्या त्या आयफोन ज्युनिअर ला एक पोरगी पटली आहे, मला का नाही?

टपरी वर चहा पिताना शंकेने बघतात लोक, की हा StarBucks कॉफी सोडून इथे का पितोय, चोरीचा असेल आयफोन.

हातातले साधे घड्याळ बघून client बोलला की आयफोन वाल्याने iWatch जर नाही वापरलं तर ते धोतरावर इन केल्या सारखं दिसत. आता iWatch साठी पैसे साठवून मग ते इकत घ्यावं म्हणतोय. बघू काय होतेय.

Leave a comment