एका डॉक्टर च्या मुलीला school मधे html css होते. त्यांनां एक छोटा प्रोजेक्ट करायला सांगितलेला. सतत एक्स्पर्ट एक्स्पर्ट च्या गप्पा मारणाऱ्या डॉक्टर पप्पा ने एका मित्रा करवी एका engineer चा contact काढला आणि त्याला बोलला की असे असे आहे, एवढे करायचे आहे.
इंजिनिअर बोलला. सर, याला apache tomcat webserver लागते, ते विकत घ्यायला लागेल. ते hosting च्या package सोबत येईल. ते वर्षभरासाठी होईल, तुमच्या मुलीला practice ला होईल, शिवाय शाळेत छाप पडेल. Hosting घेतली तरी त्याला आपल्याला एक domain घ्यायला लागेल, त्याशिवाय ते जगाला दिसणार नाही.
तुमची मुलगी email आणि एसएमएस पण पाठवू बघेल त्यासाठी आपण एक एसएमएस gateway घेऊ आणि email तर पाहिजेच, अगदी कॉमन आहे ते. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट outlook ची service घेऊ.
डॉक्टर बोलला – या एवढ्या ची गरज आहे का?
इंजिनिअर: (मनात: तुम्ही कसं ताप असला तरी MRI करायला लावता?) अहो सर, गरज आहे ना. तुमच्या मुलीला freedom राहील तिला काय करायचे ते. हे पॅकेज घेतले की सगळं unlimited असेल, कष्याचीच लिमिट नसेल.
डॉक्टर: साधारण किती येईल खर्च?
इंजिनिअर: पॅकेज चे ५२००० होतील, आणि माझी फी द्या ५ डॉलर प्रति तास प्रमाणे. त्यात मी प्रोजेक्ट पण करून देईल आणि तुमच्या मुलीला ट्रेनिंग पण देईल.
डॉक्टर: चालेल. घ्या कार्ड.
एक वर्षांनंतर
डॉक्टर: हॅलो, ते आपले पॅकेज घेतलेलं, त्याचे renewal चे सारखे मेल्स येत आहेत. ते नाही केले तर बंद पडते का?
इंजिनिअर: हो. बंद पडते.
डॉक्टर: अहो मग एवढ्याश्या कामासाठी एवढे मोठे packages का घेतले? ते तर पडूनच होते नुसते काही उपयोग नाही झाला त्याचा.
इंजिनिअर: तुम्ही कसे नको त्या टेस्ट लिहून देता. ताप आला की MRI, सर्दी झाली की वेगवेगळ्या रक्त चाचण्या अगदी तसेच आहे सर हे.
डॉक्टर: चादरमोड.
टीप: स्थळ अर्थातच Parallel universe. दरवेळी पुणे नसते.